---Advertisement---

गोळी झाडली नंतर कोयत्याने वार करीत एकाचा खून !

By team
On: March 17, 2024 10:45 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील तरुण हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे थांबला असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत खुर्चीत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना शनिवारी रात्री घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवना केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

शनिवारी 16 मार्चला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता. यावेळी चार चाकी मधून आलेल्या सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!