---Advertisement---

अक्कलकोट येथे सोमवारी भाजपच्यावतीने दिव्य काशी, भव्य काशी कार्यक्रमाचे थेट प्रसारण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.११ : दिव्य काशी, भव्य काशी श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण सोमवार (दि.१३ )डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या काशी येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारण अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी
दिली.

अक्कलकोट बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन मंदिरात यानिमित्त श्री मल्लिकार्जुन महाभिषेक देखील करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून या कार्यक्रमाला भाजपचे इतर पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तरी अक्कलकोट शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!