---Advertisement---

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना शिवराज म्हेत्रे मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.८ : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवीभक्तासाठी युवा नेते शिवराज म्हेत्रे मित्रपरिवाराच्यावतीने कुंभारी जवळ हॉटेल कामत शेजारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनीही सदिच्छा भेट देऊन भाविकांना महाप्रसाद वाटप केले. महाप्रसादस्थळी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी सदिच्छा भेट दिली व देवी भक्तांना महाप्रसाद वाटप केले. या उपक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असल्याचे युवा नेते काशिनाथ कुंभार यांनी सांगितले.

महाप्रसाद सेवेसाठी माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, विधानसभा अध्यक्ष बाबा पाटील, अभिषेक लोकापुरे,जगदीश हळगोदे, सुनील इसापुरे, सिद्धू म्हेत्रे,रमेश चव्हाण, गौरीशंकर स्वामी, राहुल भकरे, विनीत पाटील, सोमनाथ चिकलांडे, गुरु म्हेत्रे, दस्तगीर जमादार,लक्ष्मण चितळेसह शिवराज म्हेत्रे मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!