छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत असून आता मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याने त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सतत सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालवल्याचं सांगण्यात आलं आहे.
आज सकाळी काही कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी जरांगे पाटील यांना त्यांच्यासमोरच भोवळ आली. या कार्यकर्त्यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल केले. सततचं उपोषण आणि दौरे यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेली काही दिवस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे.