---Advertisement---

मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पुढाकार : मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक 

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर प्रतिनिधी : मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा समाजातील गरीब, अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी मराठा कुटुंबातील मुलींना सोलापूर शहरात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नसल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवत नाहीत. परिणामी त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. ही समाजाची गरज लक्षात घेवून, मोफत किंवा नाममात्र पैशात मुलींच्या राहण्याची सोय करण्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी जातीने लक्ष घालून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याविषयी मंगळवारी मंत्रालयात महसूलमंत्री यांच्या दालनामध्ये या विषयावर महत्वपूर्ण बैठक घेतली.

सकल मराठा समाज सोलापूरचे समन्वयक माऊली पवार आणि महसूलमंत्री यांच्यात चर्चा घडवून आणली.तसेच वसतिगृहाची आवश्यकता मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. वास्तविक पाहता समाजाची ही मागणी जुनीच असून समाजाला अद्याप न्याय मिळाला नाही. तो न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत प्रयत्नशील आहेत. सकल मराठा समाजातील सर्व लोकांनी त्यांच्या कार्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार मानले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सकल मराठा ट्रस्टचे माऊली पवार, राजा माने, दत्तामामा मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!