मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरण चांगलेच तापले असतांना आता या वादात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे हा जीव घेणा खेळ थांबवा, असे आवाहन देखील अंधारे यांनी केले.
धनंजय देशमुख हे आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुषमा अंधार यांनी केला आहे. यासंदर्भात सुषमा अंधार यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
या संदर्भात सुषमा अंधारे यांनी लिहिले की, ‘उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त “आकां”चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोग मध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा… !! ‘