---Advertisement---

श्रीनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सातलिंग शटगार यांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी तर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नाथ प्रशाला शांती नगर, सोलापूर येथील क्रियाशील मुख्याध्यापक श्री. सातलिंग शटगार यांना लायन्स क्लब सोलापूर सिटी तर्फे आदर्श मुख्याध्यापक म्हणून माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते सुधीरजी खरटमल अध्यक्ष मोहन भूमकर आनंद पूनामिया यांच्या उपस्थितीत होटेल समृद्धी येथे पुरस्कार वितरण समारंभात स्मृतिचिन्ह, शाल, प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार दिलीपराव माने म्हणाले की शटगार सर हे बहुआयामी व्यक्ती असून राजकारणा पेक्षा सामाजिक कार्याची त्यांना आवड असून गेल्या २५ वर्षापासून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचे मोठे काम केले असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे मोठे काम आहे. सलग १००% निकाल, बोर्ड परीक्षांचे कामकाजा बरोबर ते भरारी पथकाचे सदस्य म्हणूनही कार्यरत असतात. व्यवसायाने ते मुख्याध्यापक असले तरी ते पत्रकारितेतील मास्टर आहेत असे ते म्हणाले. सुधीर खरटमल म्हणाले शटगार कोणतेही काम करत असताना, मनापासून काम करतात आणि ते यशस्वी करून दाखवतात ते स्वाभिमानी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे असे ते म्हणाले.

शटगार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी साहेब, माजी आमदार निर्मला ठोकळ, संस्थेचे अध्यक्ष नागनाथ सुरवसे सर, सचिवा संजीवनी ताई पडवळकर, श्रीपाद सुरवसे सर, सागर सुरवसे सर, गांधी फोरम अध्यक्ष पुरूषोत्तम बलदवा, माजी महापौर अलका राठोड, सुशीलाताई आबुटे, नलिनी चंदेले आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!