---Advertisement---

मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर : राज्यात चर्चेला उधान !

By team
On: December 5, 2023 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील शिंदे – फडणवीस व पवार सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवीत असतांना हाच कार्यक्रम आज परळीत सुरु असून याठिकाणी अनेक नेत्यांचे देखील भाषण झाले आहे.

मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता. पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? इथपासून कार्यक्रमातील राजकीय टोलेबाजीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा पाहायला मिळाली. अखेर हा कार्यक्रम आज परळीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केलेल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला !

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी सरकारमधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या तिन्ही व्यक्ती हजर राहिल्यामुळे कार्यक्रमात ही नेतेमंडळी नेमकी कोणती भूमिका मांडणार? याची उत्सुकता त्यांच्या नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळालाही लागलेली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या विधानामुळे व्यासपीठावरील मान्यवरांच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर उमटली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!