---Advertisement---

छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग

On: February 22, 2021 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ट्वीट करुन याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना आढावा बैठक, साहित्य संमेलन आढावा बैठक तसेच इतरही अनेक बैठकांचे त्यांनी आयोजन केले होते. यामुळे त्यांच्या संपर्कात जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि साहित्य संमेलनाशी संबंधित अनेक जण आले आहेत.

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणार्‍या नागरिकांकडून 1 हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!