---Advertisement---

चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या चपळगावात विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि. १६ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे प्रमुख उमेश पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे उद्या सोमवार (दि.१७ ऑक्टोबर ) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उमेश पाटील मित्र परिवाराने दिली आहे.यानिमित्त ग्रामस्थांवतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त नागरिक सत्कार होणार आहे. चपळगाव येथील विविध विकास कामात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मित्रपरिवाराकडून सत्कार सोहळा पार
पडणार आहे.

चपळगाव येथील डीसीसी बँकेच्या समोरील प्रांगणात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व गोर गरीब महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी परिसरातील विविध गावचे सरपंच,प्रमुख नेतेमंडळी, संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील मित्र परिवाराने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!