---Advertisement---

सोलापुरातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी एकास अटक !

By team
On: December 20, 2023 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील हत्तुरे वस्ती येथील सालिया महबूब शेख (वय २५, रा. ओम नमः शिवाय नगर) हिच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. यापैकी वसीम शेख यास अटक करण्यात आली असल्याचे विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या बोहल्यावर चढण्याअगोदरच सालिया शेख या युवतीने तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी पहाटे आत्महत्या केली होती. या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा शेख हिच्या नातेवाईकांनी घेतला होता. यातील वशिम शेख यास काल अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सालिया शेख हिने १५ डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख (सर्वजण रा. कुमठे ) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हे तिघेजण मिळून सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत. होणाऱ्या नवऱ्यालाही अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुझे लग्न कोणाबरोबर होऊ देणार नाही अशी धमकीही दिल्याचे सालिया शेख हिने फिर्यादीत म्हटले होते. त्या अनुषंगाने या आरोपींचा शोध विजापूर नाका पोलीस स्टेशनच्यावतीने सुरू होता. यापैकी एकास काल अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!