मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण यापूर्वीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील सरकारने प्रकरण दाबले असा खोटा आरोप गृहमंत्र्यांनी केला होता. त्यामुळे आपण हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला अशी माहिती फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मराठा आरक्षण प्रश्नी अशोक चव्हाणांविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विधानसभेबाहेर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील कायद्यांबाबत चव्हाणांना माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली. एसईबीसी कायदा अडचणीत आणण्याबाबत सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षण प्रश्नी अशोक चव्हाण यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.