---Advertisement---

संतापजनक : विश्वास संपादन करीत २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्ष अत्याचार

By team
On: February 20, 2024 10:38 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ होत असतांना नुकतेच नवी मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीएमसीमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीवर २ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगरमधील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलीय. मात्र अद्याप याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्षापासून अत्याचार होत होता. याप्रकरणात अहमदनगरमधील एका व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. अत्याचार करणारा आरोपी हा तरुणीला ब्लॉकमेल करत होता. पीडिता बीएमसीमध्ये नोकरीला आहे, तर आरोपी व्यक्ती हा अहमदनगरमधील राहणारा आहे. तरुणीने अत्याचाराची तक्रार कामोठे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व्यक्तीने तरुणीशी आधी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सलग दोन वर्षांपासून या व्यक्तीने तरुणीवर अत्याचार केला. बदनाम करण्याची धमकी देत हा व्यक्ती तरुणीवर वारंवार अत्याचार केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!