---Advertisement---

रिपाईच्या संविधान सन्मान मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे

By team
On: February 22, 2024 9:26 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या संविधान सन्मान मेळाव्यास तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रिपाईने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले.

अक्कलकोट तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.दि.२५ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील नॉर्थकोट मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान जिल्हा मेळावा केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या मेळाव्यास तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी नियोजनाची बैठक अक्कलकोट येथील मैंदर्गी रोडवरील भक्त निवास या ठिकाणी संपन्न झाली असून या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सैदप्प झळकी,युवक जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू,तालुका सचिव राजु भगळे,शहराध्यक्ष अजय मुकणार, राजु बोरगाव,चंद्रकांत गायकवाड, सूरज सोनके,मंजू बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.सदर बैठकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी दिली तरच आपण मित्र पक्षाचे काम करावे अन्यथा वेगळा विचार करावे,असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या विषयावर शिक्कामोर्तब केला.यावेळी रिपाइ तालुका संघटन सचिव अंबादास गायकवाड,विलास गायकवाड,शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे,युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस तमा धसाडे,शिरवळ शाखाध्यक्ष उत्तम गायकवाड,बाबलाद गावचे सरपंच बाबू निरगुडे, सूरज सोनके,भिमा गायकवाड,सनी गायकवाड, दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमनी आदी पदाधिकारी,शाखाध्यक्ष,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!