---Advertisement---

अक्कलकोट बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकानाचे पत्रे उचकावत धाडसी चोरी !

By team
On: March 18, 2025 2:43 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट बसस्थानकाच्या समोरील कालिका मोटर्स या दुकानाचे मध्यरात्री छतावरील पत्रे उचकावून चोरठयानी दुकानात प्रवेश केला व कौटर चे दोन ड्रॉव्हर फोडून 30 हजाराची रोखड पळवली, या घटनेने बस स्टॅन्ड परिसरातील व्यापारी बांधवात खळबळ उडाली आहे.

बस स्थानकासमोर कै. सदाशिव मोरे यांच्या मालकीचे दुकान गाळे आहेत, यात सुरेश रामचंद्र वेदपाठक यांच्या मालकीचे ” कालिका मोटर्स ” या नावाचे तीन व चार चाकी वाहनाचे स्पेअर पार्टस विक्रीचे दुकान आहे. शनिवार दि. 15 मार्च रात्री ते 16 मार्च सकाळ पर्यंत च्या दरम्यान दुकानाच्या पाठीमागील भागातून चोरट्यानी दुकानाच्या छतावर चढून पत्रे उचकावून दुकानात प्रवेश केला आणि दुकानाच्या कौटर मधील दोन ड्रॉव्हार फोडून ड्रॉव्हर मधील 30 हजाराची रोखड पळवली. हा चोरीचा प्रकार रविवारी सकाळी 9/30 वाजता दुकान उघडायला मालक सुरेश वेदपाठक यांनी आल्यावर लक्षात आले. तसेच याच दुकानाचे शेजारी भूषण टोणे यांचे शेती खात्याचे दुकान आहे याही दुकानाचे पत्रे उचकावून दुकानातील ड्रॉव्हर फोडून त्यातील पाचशे रुपये रोखड व 370 रुपयाची हेड टार्च असे 870 रुपयाची चोरी चोरठयानी केली, याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बी. एन. एस. 334 (1) अन्वये गुन्हा दाखल झाला असून रमजान पाटील व एच. सी. चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. बसस्थानाका सारख्या रात्रंदिवस गर्दीच्या परिसरात असे दुकान फोडण्याचे प्रकार घडून चोऱ्या झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

” या चोरीचा पोलिसांनी छडा लावावा आणि अक्कलकोट सारख्या शहरांत अश्या घटना घडूच नये याची खबरदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे ” अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!