---Advertisement---

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या ‘’त्या’’ वक्तव्यावर अधिक भाष्य करण्यास शरद पवारांनी दिला नकार

Follow Us:
---Advertisement---

पुणे : पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अधिक भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारविषयी काही विधानं केली होती. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच हे सरकार स्थापन झालं होतं, असं ते म्हणाले होते. मी अर्धीच गोष्ट सांगितलीय. अजित पवार त्यावर बोलले तर मी पुढची गोष्ट सांगेन, असं ते म्हणाले होते.

शरद पवार यांनी यात अजिबात तथ्य नसल्याचं त्याच दिवशी सांगितलं होतं. आज एका कार्यक्रमाच्या प्रसंगी पत्रकारांनी त्यांना पुन्हा एकदा त्याबद्दल विचारलं. त्यावर, फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर अधिक भाष्य करून मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!