---Advertisement---

शिवशाही बस व दुचाकीचा भीषण अपघात : जागीच दोघे ठार

By team
On: February 3, 2024 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

बार्शी : वृत्तसंस्था

बार्शी-लातूर रस्त्यावर हॉटेल राजे नजीक बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गोपाळ जीवराज माने यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता सोमनाथ गुजर (वय ३०) व सलीम जब्बार शेख (वय २९, दोघे रा. रामेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसचालक शाहुराज यशवंत भोसले (रा. आवळी, ता. औसा, जि. लातूर) याच्या विरुध्द पोलिसात तक्रार दिली आहे. मोटारसायकल (क्र. एमएच २५ एसी ६९३७) वरून दोघेजण लातूरच्या दिशेने तर शिवशाही एस.टी. बस (क्र. एमएच ०९ इएम ८७५४) बार्शीच्या दिशेने येत होती. दरम्यान, समोरासमोर दोन्ही वाहने आल्याने मोटारसायकल बसखाली येऊन यात दोघेजण चिरडून ठार झाले. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!