---Advertisement---

धक्कादायक : कोल्हापुरात मुलाने आईला संपविले

By team
On: May 1, 2024 4:21 PM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने आईचा खून केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज मुजावर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाकडूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे. सादिक मुजावरला असे आरोपीचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याने रंगाच्या भारत आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या साळोखे पार्कमध्ये हे कुटुंब राहत होते. या कुटुंबात सारखे वाद होत होते. याचदरम्यान, कोल्हापूरमधील सादिक मुजावर हा बायकोसोबत बोलत होता. त्यावेळी त्याची आई शहनाज मुजावर या मध्येच बोलल्या. यामुळे मुलगा सादिकला राग आला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. सादिकने आईच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार श्त्राने वार केले. या मारहाणीत त्याची आई शहनाज मुजावरचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सादिक मुजावर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त आई मध्ये बोललल्याने हत्या झाली की इतर काही कारणामुळे हत्या झाली? याचा तपास पोलिस करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!