---Advertisement---

मुंबईत गोळीबार : कुख्यात गुंडाचा मृत्यू !

By team
On: December 25, 2023 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

चुनाभट्टी विभागात रविवारी झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरून गेली आहे. या गोळीबारात कुख्यात गुंड सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यात एका आठ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सुमित येरुणकर हा कुख्यात गुंड काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी तो फोटो काढण्यासाठी चुनाभट्टी येथील आझाद गल्लीमध्ये आपल्या काही साथीदारांसह आला होता. या वेळी दोन अज्ञात दुचाकीवर आले, त्यानी दोन बंदुकांनी अंधाधुंद गोळीबार सुमितवर केला. यात पाच गोळ्या सुमित येरुणकर (४६) याच्या पोटाला व डाव्या खांद्याला दोन गोळ्या लागल्या, ज्यात तो मयत झाला. तर रोशन निखिल लोखंडे (३०), मदन पाटील (५४), आकाश खंडागळे (३१) व त्रिशा शर्मा (८) हे जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानी जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले. यात येरुणकरचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!