सोलापूर : सोलापूर जनता सहकारी मल्टी स्टेट बँकेचे निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. या निवडणुकीत संघ पुरस्कृत परिवार पॅनल यांच्याविरोधात बँक बचाव परिवर्तन पॅनलने आव्हान दिले होते. परिवार पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी केले. तर बँक बचाव परिवर्तन पॅनलच नेतृत्व दामोदर दरगड रामभाऊ तडवळकर प्राध्यापिका मोहिनी पत्की यांनी केले होते.
रविवार दिनांक 14 मार्च रोजी झालेल्या मतदानादिवशी 53 हजार 556 मतदारांपैकी 14 हजार 151 सभासदांनी मतदान केले होते. केवळ 26 टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र परिवार पॅनलने आपल्या विजयाचा दावा केला होता. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या नेतृत्वाखाली नूतन मराठी विद्यालयमध्ये मतमोजणी झाली. सकाळी पावणे नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री दोनच्या सुमारास संपली.
59 मतदान केंद्र असल्याने एक ते पंधरा असे चार मतमोजणीच्या फेऱ्या घेतल्या. एका फेरीसाठी सुमारे चार ते पाच तास मतमोजणीला वेळ लागला. त्यामुळे निकाल यायला उशीर लागला. मात्र पहिल्या फेरीपासून सुमारे एक हजाराचे मताधिक्य परिवार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी घेतले होते. ते मताधिक्य चारही फेऱ्यात कायम राहिले आणि या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व 17 जागा सुमारे चार हजारांच्या फरकाने जिंकल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी अतिशय उत्तम रित्या हे निवडणूक हाताळली.