---Advertisement---

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते असलं काही !

By team
On: December 14, 2023 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तराळ याने बालाजीनगर परिसरात आयुर्वेद मसाज सेंटर सुरु केले होते. मसाज सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तराळला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

याप्रकरणी मसाज सेंटरचालक उमेश मलप्पा तराळ (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तराळला अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार अजय राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!