---Advertisement---

दोन आपत्यावर थांबा : अजित पवारांनी केली विनंती !

By team
On: January 20, 2024 4:25 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे दौरा असतांना पिंपरीत परिसरात पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी एक मोठा वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, एक किंवा दोन अपत्यावर थांबा. मी खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आले तरी घरे बांधून देऊ शकणार नाही, मी लवकर आल्याने काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरे पडते. पण त्यामुळे काहींची अडचण झाल्याचे दिसत आहे.

अजित पवार म्हणाले की, बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन आपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढलेली आहार. लोकसंख्या अशीच वाढत गेली ना मग अगदी ब्रह्मदेव आले तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकणार नाही.

अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेत काहींचे नशीब उजळेल. मात्र काहींना घरे मिळणार नाहीत. त्यामुळे नाउमेद होऊ नका. तर ज्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेंभुर्णीला जाऊन तिथे उधळपट्टी करू नका, असा सल्ला अजितदादांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही पारदर्शक आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात,जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे पीए असतील त्यांच्यावर ही विश्वास ठेवू नका. नाहीतर दस का बीसचे प्रकार घडतात. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळेच तुमचे स्वप्न पूर्ण झाल, असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!