---Advertisement---

दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली : एक जण ठार तर एक जखमी

By team
On: February 26, 2024 11:15 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदुरा : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना नांदुरा – जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील मानेगाव येथे अपघाताची घटना घडली आहे. पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 50 फूट खोल असलेल्या या पुलावरून भरधाव दुचाकी नदीत कोसळली. या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसवले नाहीत. त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल येथील रहिवासी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!