---Advertisement---

दोन मुलींचा खून करीत आईने संपविली जीवनयात्रा

By team
On: May 9, 2024 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या लहानग्या मुलींना विष देत गळा आवळून ठार केले व नंतर स्वतःही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०, रा. कोणार्कनगर) असे मृत विवाहितेचे तसेच आराध्या उर्फ माऊ (८) आणि अगस्ती (२) अशी मुलींचे नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी बनविलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पती पुण्याला नोकरीनिमित्त गेलेले असल्यामुळे घरात अश्विनी यांच्यासह त्यांच्या दोन मुली होत्या. बुधवारी सकाळी आश्विनीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घरात पाहणी केली असता दोन्ही मुलीसुद्धा मृतावस्थेत दिसल्या. त्यांना विष देऊन नंतर गळा आवळून मध्यरात्रीच्या सुमारास अश्विनी हिने ठार मारल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे.

घटनास्थळावरून अश्विनीच्या हस्ताक्षरातील एक पानाची सुसाइड नोट तसेच तिचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाइलमध्ये सुद्धा आत्महत्येपूर्वी तिने स्वतःचा व्हिडीओ तयार करून ठेवला. शूट केलेल्या व्हिडीओमध्ये व्यथा मांडून आत्महत्येचे कारण सांगत स्वतःच्या पतीला स्वतःसह दोन्ही मुलींच्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. हा व्हिडीओ अश्विनीने माहेरच्या नातेवाइकांच्याही मोबाइलवर पाठविल्याचे समजते. आश्विनीने सकाळी टेरेसवरून उडी घेतल्यानंतर ती अपार्टमेंटच्या लोखंडी प्रवेशद्वारावर आदळून रस्त्यावर पडली यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने सर्व रहिवासी घराबाहेर धावले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!