ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्यासह चांदीचा दर वाढला !

मुंबई  : वृत्तसंस्था

नव्या वर्षाचा पहिलाच सण मोठ्या उत्साहात पार पडला तर मौल्यवान धातुच्या किंमतीत मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी त्याची वसूली झाली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. सणासुदीला भाव वधारण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण त्यानंतर पडझड झाली. आता किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या

मागील दोन आठवड्यात सोन्याने तुफान बॅटिंग केली. तर या आठवड्यात सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. 14 तारखेला त्यात 110 रुपयांची घसरण झाली. तर 15 जानेवारी रोजी 110 रुपयांनी किंमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या महिन्यात चांदीने मोठी भरारी घेतली. चांदी जवळपास 5 हजारांनी वधारली. तर या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. 14 तारखेला त्यात दोन हजारांची घसरण झाली. तर 15 जानेवारी रोजी चांदी एक हजार रूपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!