---Advertisement---

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोट खराबचा शेरा आता हद्दपार होणार !

By team
On: May 1, 2025 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या  आदेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३१७ सातबारावरील २४५ एकर पोट खराब जमीन ही लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत ही क्रांतिकारी योजना राबविण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.ब्रिटिश कालापासून हा प्रश्न होता.चांगली जमीन असूनही पोट खराबच्या नावाखाली हे क्षेत्र सातबाऱ्यावर लागवडीखाली येत नव्हते.

आता या निर्णयामुळे मात्र सर्व क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.तहसीलदारांनी परिपत्रक जारी केल्यानंतर सर्व मंडल अधिकारी आणि सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी गाव पातळीवर शेतकऱ्यांना व नागरिकांना दवंडी देऊन या परिपत्रकाची जनजागृती केली होती.त्यानुसार ३१७ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवरील पोट खराब क्षेत्र कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाली आहे.आता सातबारा उतारावरील पोट खराब कॉलम मध्ये नमूद क्षेत्र हे लागवडीखाली घेतल्याने सदरचे क्षेत्र हे पोट खराब कॉलम मधून कमी होऊन लागवडीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट होईल.त्यामुळे पोट खराब क्षेत्र हे लागवडीखाली आणल्याने सदर जमिनीच्या मूल्यांकनामध्ये वाढ होईल. तसेच बँकेचे कर्ज काढता येईल. पोट खराब क्षेत्रामुळे शेती उत्पन्नाची घट हे कमी होईल आणि लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होईल.पोट खराब क्षेत्रामध्ये कोणतेही पीक घेता येत नव्हते.

पोट खराब क्षेत्र लागवडीखाली घेतल्याने या जमिनीवर पिके सुद्धा घेता येतील. पोट खराब क्षेत्र कमी झाल्याने शेतीचे उत्पन्न वाढेल.त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. त्याशिवाय आर्थिक अडचणीमुळे येणारे वेगवेगळे प्रसंग हे कमी होतील, अशी माहिती तहसीलदार मगर यांनी दिली.अजूनही ही मोहीम सुरू आहे.पण यात पोट खराब वर्ग अ ची जमीनच लागवडीखाली आणता येईल. पोट खराब वर्गाची जमीन ही लागवडीखाली आणता येणार नाही.अ वर्गातील तालुक्यातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी
आपले पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी अक्कलकोट तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.

पोट खराब वर्ग अ म्हणजे काय ?

ज्या जमिनीच्या भूमापनावेळी कृषी अयोग्य म्हणून वर्गवारी करण्यात आलेली आहे अशी जमीन. यामध्ये धारकाच्या कृषी क्षेत्रावरील इमारती किंवा खळ्याचा समावेश होतो.यावर आकारणी करण्यात आलेली नसते.यातील कोणतीही पोट खराब जमीन लागवडीखाली आणता येईल.

पोट खराब वर्ग ब म्हणजे काय ?

सार्वजनिक क्षेत्रात प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन. रस्ता मान्य पदपथ यासाठी राखीव जमीन पिण्यासाठी किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव
किंवा ओढा यांनी व्यापलेले किंवा कोणत्याही जाती जमाती करून दहन भूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरण्यात येणारी जमीन तसेच गावातील कुंभार समाजासाठी कुंभार कामासाठी अभिहस्तांतरित केलेली जमीन. या सर्व जमिनीवर कोणत्याही प्रकारची महसुली आकारणी करण्यात येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!