---Advertisement---

बसखाली चिरडून तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: December 22, 2023 10:39 AM
Follow Us:
---Advertisement---

बार्शी: वृत्तसंस्था 

बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी नजीक एसटी बसने स्कूटीला चिरडल्याने स्कूटीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २१ डिसेंबर रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात कार्तिक रोहीत यादव (वय १७, रा. जोरे गल्ली, धाराशिव), ओंकार अनिल पवार (वय २०) आणि ओम दत्ता आतकरे (वय २२, दोघे रा. शिंगोली, धाराशिव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील जखमींची नावे समजू शकली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीकडून धाराशिवकडे भरधाव निघालेल्या पुणे-धाराशिव एसटी बस (क्र.एमएच ४० एन ९७५६) ने गुरुवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी गावानजीक समोरुन येणाऱ्या स्कूटी (क्र. एमएच २५ एयू ००९१) ला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की एसटी बसने स्कूटीला दूरवर फरफटत नेले. या दरम्यान स्कूटी गाडीवरील तिघेजण बसखाली आल्याने फरफटत जाऊन तिघांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले होते. अपघातादरम्यान तरुणांची दुचाकी बसच्या पुढील बाजूला तरुणाचे तर घड शरीरापासून पूर्णपणे तुटून दूरवर पडल्याचे भीषण दृष्य दिसत होते. घटनास्थळावरील दृष्य मन हेलावून टाकणारे होते.

या अपघातात एसटी बसमधील काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये एसटी बस चालक, वाहक व अनेक प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जखमींना बार्शी व सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!