---Advertisement---

विनोद कांबळीची प्रकृती खालावली

By team
On: December 23, 2024 7:32 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती खालावल्याने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या असून डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

अलीकडेच कांबळीने विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या तब्येतीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला लघवीशी संबंधित समस्या येत होत्या. मी चक्कर येऊन पडलो होतो. माझा मुलगा येशूने मला उचलले आणि माझ्या पायावर उभे केले. माझी मुलगी आणि माझी पत्नी मदतीसाठी पुढे आली. डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला सांगितले होते. तेव्हा सचिन तेडुंलकरने माझ्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च केला होता.

विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने १९९३ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. तो भारतासाठी सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा फलंदाज होता. त्याने १४ डावात ही कामगिरी केली होती. पण, नंतर तो दिश भरकटला आणि क्रिकेटमधून त्याचे लक्ष विचलित झाले. त्याने १७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १०८४ धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये ४ शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टीम इंडियासाठी १०४ वन डे सामन्यांमध्ये एकूण २४७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकं आहेत.

विनोद कांबळीची अवस्थान पाहन १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंनी त्याला मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्याने स्वतः रिहॅब केंद्रात जावे, अशी अट त्यांनी ठेवली आहे. माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी, विनोद कांबळी त्यांच्या मुलासारखा असून, ते त्याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!