---Advertisement---

ग्राहकांच्या उत्साहावर फिरले पाणी ; सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

By team
On: December 20, 2023 10:05 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्यासह चांदीत मोठी दरवाढी झाली होती. हे दरवाढीचे सत्र कायम आहे. लग्नसराईमुळे सराफा बाजार सध्या फुलला आहे. अशावेळी या दरवाढीने ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. जागतिक बाजारात दरवाढीला पोषक वातावरण नाही. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार, बडे गुंतवणूकदार त्यांचे धोरण बदलवतील. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतीवर दिसून येईल. डिसेंबर महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. अनेक विक्रम नावावर नोंदवले. या आठवड्यात भाव वधारले आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीला 19 डिसेंबर रोजी सोन्याने दरवाढीची सलामी दिली. सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. गेल्या आठवड्यात सुरुवातीला सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर सोने 1100 रुपयांनी वधारले. सकाळी अजून भावाची अपडेट आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीने 3500 रुपयांची उसळी घेतली होती. 16 डिसेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची घसरण झाली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,500 रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!