---Advertisement---

बंदीचा प्रयत्न झाला, तेव्हा मुस्लिम व्यक्तीने केला होता बचाव; मोहन भागवतांचा खुलासा

Follow Us:
---Advertisement---

नागपूर, वृत्तसंस्था : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर १९३० च्या दशकात बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी संघाच्या समर्थनार्थ एकही स्वयंसेवक पुढे आला नव्हता; मात्र इब्राहिम नावाच्या एका व्यक्तीने संघाची बाजू मांडली होती, असा ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

भागवत म्हणाले की, १९३० च्या दशकात सेंट्रल प्रोव्हिन्सेसच्या विधानसभेत संघावर पहिल्यांदा बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी संघाची विचारधारा समर्थित करणारा कोणीही पुढे आला नव्हता. मात्र, इब्राहिम नावाच्या व्यक्तीने संघाच्या समर्थनार्थ आवाज उठवला. संघाला बंद करू नये, कारण संघ सांप्रदायिक नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

इब्राहिम यांनी आपल्या भाषणात डॉ. हेडगेवार यांचा उल्लेख केला होता. ‘हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, असे म्हणणाऱ्यांना मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे, असे मला वाटते. मात्र, मी डॉ. हेडगेवार यांना ओळखतो. ते वेडे नसून चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेला संघ सांप्रदायिक असू शकत नाही,’ अशा आशयाची भूमिका इब्राहिम यांनी मांडल्याचे भागवत यांनी सांगितले.

संघाची स्थापना होऊन त्यावेळी काही वर्षेच झाली होती. त्यामुळे संघाबाबत फार कमी लोकांना माहिती होती; मात्र डॉ. हेडगेवार यांना अनेक जण ओळखत होते. संघाच्या सुरुवातीपासूनच स्वयंसेवक ही संघाची ओळख बनले आणि आज शंभर वर्षांनंतरही स्वयंसेवक हेच संघाचे खरे वैशिष्ट्य असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.

यावेळी भागवत यांनी संघाच्या प्रचारकांच्या जीवनकार्याचाही उल्लेख केला. प्रचारक कोणत्याही वैयक्तिक किंवा भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता संघकार्याला समर्पित असतात. समाजासाठी अधिकाधिक चांगले काम कसे करता येईल, हाच त्यांचा विचार असतो, असे त्यांनी सांगितले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!