---Advertisement---

अक्कलकोट येथे सेवेची संधी म्हणजे माझे भाग्यच – मुख्याधिकारी सचिन पाटील

On: January 25, 2021 6:29 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी)  –  आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी समर्थांच्या पावन नगरीतील अक्कलकोट नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. ही स्वामी समर्थांची कृपाच आहे. मुख्याधिकारी पदी येथे राहून काम करण्याची मिळालेली संधी म्हणजे माझे भाग्यच असल्याचे मनोगत अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी व्यक्त केले.

ते अक्कलकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी सचिन पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला, यावेळी बोलताना मुख्याधिकारी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी नगरपरिषदेचे आरेखक मल्लिनाथ स्वामी, फिरोज शेख, नितीन पेटकर, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!