---Advertisement---

एमटीएस परीक्षेत श्रेयस परशेट्टी तालुक्यात प्रथम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत चपळगाव येथील रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी श्रेयस विनोदकुमार परशेट्टी याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीच्या गटातुन संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. ग्रामीण भागातील इंग्लिश मीडियम स्कूल सुद्धा आता पाठीमागे राहिल्या नाहीत.शहरातील शाळेच्या धर्तीवर यश संपादन करताना दिसत आहेत.

यासाठी मुख्याध्यापक दिगंबर जगताप व स्कूल मधील सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थापक तथा सरपंच उमेश पाटील, जेष्ठ नेते कुमारप्पा पाटील आदींनी कौतुक  केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!