---Advertisement---

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्या खबरदारीच्या सूचना,पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.७ : दिवाळी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील आणि उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना पोलिसांतर्फे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करावे,असे आवाहन उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्लप्पा
पुजारी यांनी केले आहे.
सध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे.त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका.दिपावलीसाठी बाहेरगावी जायचे असल्यास घरात असलेले पैसे,दागिने बँकेत ठेवावेत.आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी.बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये. प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ पिऊ नयेत.त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते. प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे,गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे, व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत,कोरोना आजाराच्या अनुषंगाने विना मास्क कोणीही बाजारा मध्ये फिरू नका,सोशल डिस्टन्सचे पालन करा,असे आवाहन पोलीस निरीक्षक पुजारी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!