---Advertisement---

दुधनी जंगम समाज अध्यक्षपदी मल्लय्या गौर, तर उपाध्यक्षपदी गुरुशांतय्या मठपती

On: January 9, 2021 11:58 AM
Follow Us:
---Advertisement---

दुधनी (गुरुशांत माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जंगम समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा दुधनी विरक्त मठात विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुधनी जंगम समाज अध्यक्षपदी मल्लय्या हिरेमठ, उपाध्यक्षपदी गुरुशांतय्या मठपती, कल्लय्या बाहेरमठ तर कार्यकारी अध्यक्षपदी गदगय्या मठपती (सर),खजिनदारपदी इरय्या स्थावरमठ, आनंद बाहेरमठ सचिवपदी गुरय्या बाहेरमठ, सहसचिव मल्लय्या मळसिद्दय्या हिरेमठ यांची एकमताने निवड करण्यात आले. त्यांनतर दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रारंभी कर्तृ लिं.शांतलिंगेश्वर महास्वामीजीं आणि लिं. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजीं यांच्या समाधीला महाआरती करण्यात येऊन त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी मावळते अध्यक्ष महेश बाहेरमठ, उपाध्यक्ष महानिंगय्या बाहेरमठ, मल्लय्या मठपती, संचालक रेवणय्या हिरेमठ, मल्लया स्वामी, गुरूपादय्या सालीमठ, शिवानंद मठपती, मल्लय्या पुराणिक, चंद्रय्या मठपती, शिवानंद हिरेमठ, संजय बाहेरमठ, इरय्या पुराणिक, महानिंगय्या गौर, प्रकाश हिरेमठ, सुगुरेश बाहेरमठ, सिद्धाराम हिरेमठ, शिवानंद स्थावरमठ, परूतय्या मठपती, नागय्या हिरेमठ आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!