---Advertisement---

भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती ; परंतु…राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

On: January 23, 2021 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपने पक्ष प्रवेश करण्यासाठी मला १०० कोटींची ऑफर दिली होती. पण, ती ऑफर मी धुडकावली, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटमुळे राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगून पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे ते म्हणाले.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!