---Advertisement---

राष्ट्रवादीला मोठा धक्का : डाॅ. धवलसिंह मोहिते पाटलांचा उद्या काॅग्रेसमध्ये प्रवेश

On: January 27, 2021 11:48 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर | अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील  उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काॅग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

 

राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डाॅ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशा नंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधान सभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता. परंतु राष्ट्रवादीने पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते.

 

त्यानंतर त्यांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुंबईत टिळक भवनात काॅग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटिलसह काॅग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!