सोलापूर ,दि.७ : उत्कर्ष क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खो खो खेळाडू रामचंद्र तानाजी जाधव (वय ५८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले. राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राने सेवेल घेतले होते. त्यांच्या कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा पुरुष संघास उपविजेतेपद मिळाले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व सून असा परिवार आहे. अवंती नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी ८ वाजता त्याची अंतयात्रा निघणार आहे.
——-photo—-