---Advertisement---

विनोद मदने यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड

On: December 21, 2020 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : अक्कलकोट शहर युवासेनेच्या प्रमुख पदी युवानेते विनोद मदने  यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना राज्यकार्यकारणी सदस्य व युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांनी रविवारी सोलापूर येथे युवासेनेची नविन पदाधिकार्यांची निवड जाहीर केली. युवासेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे यानी संपूर्ण जिल्हात दौरा करून युवासेनेची नविन फळी निर्माण केली  आहे. अक्कलकोट शहर युवासेना अधिकारी (प्रमुख) पदी विनोद मदने यांची निवड करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने त्याचे सत्कार करण्यात आले. यावेळी विनोद मदने म्हणाले. अक्कलकोट शहरात युवासेनेघी फळी निर्माण करुन शिवसेनेची ताकत वाढवणार आहे असे म्हणाले.

यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, तालुका उपप्रमुख प्रा. सूर्यकांत कडबगावकर, प्रविण घाटगे, तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. वर्षा चव्हाण शहरप्रमुख, सौ. वैशाली हावनूर, उपप्रमुख सौ. ताराबाई कुभांर, शहर उपप्रमुख राहुल चव्हाण, सुरेश डिग्गे, प्रसिद्धीप्रमुख  बसवराज बिराजदार, खंडू कलाल यांनी विनोद मदने यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!