---Advertisement---

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन

On: January 11, 2021 6:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

ऑगस्ट २०२० मध्ये अनुष्का आणि विराट यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करून संपूर्ण जगाला ही गोड बातमी दिली. तसंच जानेवारी २०२१ मध्ये बाळ जन्माला येईल असंही त्यांनी सांगितलं. दोघांनी एकच फोटो शेअर केला ज्यात अनुष्काने काळ्या रंगाचा पोल्का डॉट ड्रेस घातला होता. तिच्या मागे विराट उभा होता. या फोटोत अनुष्का बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसते. ‘आणि आम्ही दोनाचे तीन झाले.. जानेवारी २०२१ मध्ये येणार तिसरा पाहूणा..’

दरम्यान, बंगळुरुच्या एका ज्योतिषीने विराट आणि अनुष्काला मुलगी होईल, असे भाकित वर्तवलं होते. “विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!