---Advertisement---

शिवनिर्मलच्या आरोग्य शिबिरात ९६ रुग्णांची तपासणी, वर्धापनदिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट येथील शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ९६ महिलांची तपासणी करण्यात आली.डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी महिलांची तपासणी केली.हे शिबिर दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिवनिर्मल हॉस्पिटल येथे पार पडले.
यामध्ये प्रसूतीपूर्व,प्रसुतीपश्चात मोफत तपासणी व उपचार,वंधत्व निवारण सल्ला, मासिक पाळीच्या समस्या त्यावर सल्ला आणि उपचार,कुटुंब नियोजन सल्ला त्याच बरोबर मशीनद्वारे पोस्ट मेनोपौसल स्त्रियांसाठी अर्थात हाडांची ठिसूळता तपासणी बीएमडी स्कॅनर द्वारे करण्यात आली.

त्याशिवाय हिमोग्लोबिन आणि ७० महिलांची कॅल्शियम तपासणी करण्यात आली.या आरोग्य शिबिराचा लाभ अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील महिलांनी घेतला.यापुढे सामाजिक बांधिलकीतुन असे उपक्रम
आपण राबवू,असे डॉ.संगोळगी यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!