---Advertisement---

सोलापूर : महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी

On: January 8, 2021 12:47 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. दरम्यान, कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडला आहे.

महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक आहेत. महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार होते. खुद्द शरद पवार  यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार नियोजित होता. मात्र महाविकास आघाडी करुन सत्तेत आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष फोडाफोडी टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षातील नेते फोडणे हे आघाडीला धोकादायक असल्याचं वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्याचीच प्रचिती पारनेर नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे समोर आला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!