---Advertisement---

पंजाबमधील महिलांसाठी अरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा!

Follow Us:
---Advertisement---

पंजाब : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या निवडणुकीच्या तोंडावर पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील महिलांसाठी महत्त्वाची आणि मोठी घोषणा देखील केली आहे. त्याच बरोबर अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

केजरीवाल म्हणाले कि, पंजाबमध्ये ”आप”चं सरकार सत्तेवर आल्यास १८ वर्षांच्यावरच्या सर्व महिलांना दरमहा १००० रुपये वेतन देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार आल्यास हे आश्वासन नक्कीच पु्र्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले आहेत.

देशात येत्या काही महिन्यावर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या निवडणुकीच्या तोंडावर पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. तसेच यावेळी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांनी ऑटो रिक्षामधून प्रवास केला. त्याबरोबरच रिक्षा चालकाच्या घरी जेवणही केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!