---Advertisement---

सेवानिवृत्ती निमित्त प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

दुधनी : येथील कै.मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी हे २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त संस्थेचे प्रतिनिधी चंद्रकांत म्हेत्रे यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

प्रदीप कुलकर्णी यांचे सेवानिवृत्ती नंतरचे जीवन सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो. तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा भावना उपस्थित सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.

सलग बावीस वर्षे आपण एकमेकांच्या सान्निध्यात हसत-खेळत तर कधीकधी भांडत- रुसत घालवले. यातूनच आपले प्रेमाचे ऋणानुबंध तयार झाले. मोठ्या भावाप्रमाणे कधी अधिकार तर कधी कर्तव्य पार पाडत तुम्ही आमच्या मनात स्थान निर्माण केले. म्हणूनच की आज तुम्हाला निरोप देताना मनात खिन्न झाले आहे, असे मत चंद्रकांत म्हेत्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी महिबूब बडेखा, नंदकुमार दळवी, विजय गुरव, मुजीब शेख, मुत्तप्पा हिरकुर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!