---Advertisement---

अक्कलकोट येथे म.रा. मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचा शुभारंभ

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : शहरातील विजयकामगार चौक परिसरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा अक्कलकोटच्या कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संपादक, सुनिल पवार यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाच्यां प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यातील संघटनेच्या पत्रकार सदस्याना व जनतेला सोयीचे होण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे होते.

या कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव विश्वनाथ चव्हाण, माजी अध्यक्ष स्वामीराव गायकवाड, खजिनदार रमेश भंडारी, सदस्य गौतम बाळशंकर, गणेश भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष सिद्धाराम घटकांबळे,स्वामीनाथ सोलंकर, बाळासाहेब खैराटकर, महेश गायकवाड, राजेश जगताप, शंकर माळी, किरण गायकवाड, समाधान आहिरे, दयानंद दणूरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सुनिल पवार, कमलाकर सोनकांबळे, स्वामीराव गायकवाड, गौतम बाळशंकर आदीनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विश्वनाथ चव्हाण यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!