---Advertisement---

काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, काँग्रेसच्या “या” नेत्याने करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला आठवण

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आली? असा सवाल शिवसेनेने विचारला होता. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. “काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याचा तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं खोचक वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.

“खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं ट्वीट डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!