मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

वागदरीतील ‘या’ युवकांनी दिले जखमी मोराला जीवनदान !

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील अनिल सपुरे या तरूणाने राष्ट्रीय पक्षी असणार्‍या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेली आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
वागदरी महाराष्ट्र कर्नाटक सिमे लगत महामार्गावर भरधाव मोटार सायकलने वन्य प्राणी मोराला धडक दिल्याने मोर जखमी अवस्थेत पडून होता.वागदरीतील अनिल सपुरे यांनी पाहून मोरास उचलून बाजूला केले व त्याला पाणी पाजले.अनिल यांनी ताबडतोब गावातील काही नागरिक तंटामुक्त अध्यक्ष राजू यादव यांना फोन करून मोराबद्दल माहिती दिली.त्यानंतर यादव यांनी
वन विभागाशी संपर्क साधून अधिकार्‍यांना माहिती दिली.तोपर्यंत वागदरी येथील बसवराज पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष राजू यादव,सुरेश कलशेट्टी व सर्कल कांबळे यांनी मोराला गाडीने राजू यादव यांच्या घरी आणले व पाणी व अन्न दिले. वन विभगाचे कर्मचारी अमोल देडे ,बाबू कालिभते,अंबादास जाधव यांच्याकडे जखमी मोरास सोपवले.आता त्याचा पुढील औषध उपचार वन विभाग करणार आहे.वागदरी व परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत वाढ झाली आहे.माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना निश्चित प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment