---Advertisement---

बाळासाहेब शिरसाट अक्कलकोटचे नवे तहसीलदार म्हणून नियुक्ती

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या प्रभारी तहसीलदार पदी बाळासाहेब शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांनी गुरुवारी पदभार घेतला. शिरसाट हे यापूर्वी माण, भोर आणि पाटण तालुक्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ते करमणूक कर अधिकारी म्हणून कार्यरत होते.

आता तहसीलदार अंजली मरोड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यामध्ये नवे तहसीलदार कोण याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतची नियुक्ती केल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील जनतेची कामे तातडीने व्हावीत, यासाठी मी प्राधान्याने काम करणार आहे, एकही काम प्रलंबित न ठेवण्याचा माझा
विचार आहे.प्रशासनावरचा विश्वास वाढवण्याबरोबरच लोकाभिमुख कारभार करण्यावर आपला भर राहील, असे नुतन प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!