---Advertisement---

सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये विविध उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफाराज शेख व शबाब शेख आणि माजी नगरसेवक मित्र परिवाराच्यावतीने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे कोवीड योद्धांचा सन्मान, रुग्णांना फळ व चादरी वाटप दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी होते.याप्रसंगी बोलताना सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी म्हणाले, मानवतावादी दृष्टीने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी नगरसेवक अश्पाक बळोरगी यांनी मनोगत व्यक्त केले. शहरात श्री स्वामी समर्थ मंदिर, शेख नूरद्दीन बाबा दर्ग्यासमोर गोर गरिबांना अन्नधान्य व चादरीचे वाटप करून हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, नगरसेविका दीपमाला अडवितोटे, शहराध्यक्षा सुनिता हडलगी, डॉ.निरज जाधव, आयोजक शबाब शेख, सर्फराज शेख, शिवराज स्वामी, नबिलाल शेख, धर्मराज गुंजले, फारुख बबर्जी, वसंत देडे अल्लीबाशा अत्तार, मास बागवान, उपाध्यक्ष बसवराज अल्लोळी, अप्पू कलशेट्टी, रामचंद्र समाणे, सुनिल इसापुरे राहुल भकरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत देडे यांनी केले तर  आभार सरफराज शेख यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!