---Advertisement---

दुधनीत २ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात अक्कलकोटमध्ये उद्या महत्वाची बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे येत्या २ ऑक्टोबर रोजी स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी )अक्कलकोट विधानसभा तालुका व शहरातील आजी व माजी जिप सदस्य, पं सदस्य, सरपंच ग्रा.स दस्य, ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व अक्कलकोट शहरातील आजी व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बांधवांची बैठक १ वाजता अक्कलकोट येथील प्रमिला पार्क येथील काँग्रेस भवनात होणार आहे.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे बैठकीत मार्गदर्शन व नियोजन करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस तालुक्यातील नेते, पदाधिकाऱी, कार्यकर्ते बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!