---Advertisement---

धवलसिंह मोहिते पाटील यांचा अक्कलकोट दौरा, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उद्या बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२५ : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा लवकरच अक्कलकोट तालुका दौरा होणार आहे. यासंदर्भात उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील आजी व माजी जिप सदस्य,पं सदस्य,सरपंच ग्रा .प.सदस्य.ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते व अक्कलकोट शहरातील आजी व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता प्रमिला पार्क येथील काँग्रेस भवनात उपस्थित रहावे.

या बैठकीस माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!